अलीकडेच अभिनेत्री प्राजक्ता माळी महाकुंभमध्ये हजेरी लावण्यासाठी गेली होती. तिथे तिने भक्तिमय वातावरणात कुंभ स्नान केले. १४४ वर्षांनी होणाऱ्या या ऐतिहासिक महाकुंभात भाग घ्यावा, असा तिचा मनात ठरवलेला होता. प्राजक्ता माळीच्या आध्यात्मिक प्रेमामुळे ती नेहमीच चर्चेत असते. काहीच दिवसांपूर्वी तिने १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले होते, आणि आता महाकुंभातील अनुभव घेण्यासाठी […]
बॉलिवूडच्या पूर्व अभिनेत्री ममता कुलकर्णीने सोमवारी एक व्हिडिओ शेअर करून किन्नर अखाड्याच्या महामंडलेश्वर पदावरून राजीनामा दिला आणि “साध्वी” म्हणून तिच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरूवात करण्याची घोषणा केली. ही घटना किन्नर अखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि अखाड्याचे संस्थापक ऋषि अजय दास यांच्यात ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनविण्यावरून झालेल्या वादानंतर घडली. ममता कुलकर्णीने […]
अभिनेत्री तेजश्री प्रधान अचानक स्टार प्रवाहाची लोकप्रिय प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यामागं मालिकेतील सावणी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा निंबळेकरशी कनेक्शन असल्याचं बोललं जातंय. तेजश्री प्रधान हिने अचानक प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानं सध्या मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. तेजस्वीच्या अचानक तिच्या एक्झिटमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. पण याबाबत तेजश्रीनं अद्याप मौन धारण केल्याचं पाहायला मिळतंय. आता अभिनेत्री स्वर्धा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळत […]
उदे गं अंबे, आई तुळजाभवानी या मालिकेनंतर आणखी एक पौराणिक मालिका आपल्यासमोर येत आहे.या मालिकेत तुम्हाला एक लहान मुलगी आणि पांडुरंग यांची गोड मैत्री पाहायला मिळणार आहे. सखा माझा पांडुरंग असे या नव्या मालिकेचे नाव असून ही मालिका सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिका कोण साकारणार […]
एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ऑल्मोस्ट कॉमेडी हा नवा मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या शोमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील काही उत्तमोत्तम लेखक पहिल्यांदाच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी , ऋषीकांत राऊत यांसारख्या लेखकांनी यापूर्वी अनेक स्टँडअप कॉमेडी […]
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री सई ताम्हणकर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करत आहे. हंटर, लव्ह सोनिया, मिमी, भक्षक यांसारख्या चित्रपटांसाठी आणि नुकतेच प्रदर्शित झालेल्या अग्नी सारख्या चित्रपटांसाठी समुदाय आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम आणि कौतुक मिळविल्यानंतर, 2025 हे तिचे आतापर्यंतचे सर्वात व्यस्त आणि रोमांचक वर्ष आहे. आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट […]
नुकतंच सायलीने पैठणी साडी परिधान करत नव फोटोशूट केलं आहे.
ती मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. 2015 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर हिट ‘दगडी चाळीतील ‘ भूमिकेसाठी ती ओळखली जाते. ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला महाराष्ट्र राज्य पुरस्कारही मिळाला आहे. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी पूजाने 2008 मध्ये “महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन” ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. ‘क्षणभर विश्रांती‘ या मल्टिस्टारर चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली […]