prajakta mali tell her age प्राजक्ता माळीचं वजन किती ? थेट तिनेच सांगितलं ..

प्राजक्ता माळीचं वजन किती ? थेट तिनेच सांगितलं ..

जुळून येती रेशीमगाठी मालिकेतील मेघनाच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली, हास्यजत्रामध्ये धमाल सूत्रसंचालन करत खळखळून हसणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सगळ्यांचीच लाडकी. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला फुलवंती चित्रपट असो की प्राजक्तराज या दागिन्यांचा ब्रँड असो, चर्चेत कसं रहायचं हे प्राजक्ताला चांगल माहीत आहेत. सोशल मीडियावर कायम ॲक्टिव्ह असणारी प्राजक्ता तिच्या चाहत्यांसाठी सतत काही ना काही शेअर, पोस्ट करत असतेच. कधी चित्रपटाबद्दल , कधी ब्रँडबद्दल ती बोलत असते. ती एक चांगली अभिनेत्री तर आहेच पण तेवढीच एक यशस्वी उद्योजिकाही आहे.

या सगळ्या कामाच्या व्यापात असली तरी ती तिच्या फिटनेसकडेही तेवढंच लक्ष देतं. ग्लॅमरच्या दुनियेत असल्याने तशा तर सर्वच अभिनेत्री, अभिनेते स्वत:ची काळजी घेतातच , प्राजक्ताही त्यात मागे नाही. ती नेहमी स्वत:ला मेंटेन ठेवते. वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं न बोलणाऱ्या प्राजक्ताने यावेळीस मात्र चक्क तिच्या आयुष्याहद्दल अपडेट दिलं आहे. तिचं वजन किती हे चक्क प्राजक्तानेच एका पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना थेट सांगितलं आहे.

कधी नव्हे ते (कष्ट न घेता) छान #collerbones दिसायला लागलेत…
कधी नव्हे ते #jawline यायला लागलीए…
कधी नव्हे ते गालावरचं बाळसं उतरलय…🤪
आणि आजूबाजूचे म्हणायला लागलेत; एवढी बारीक नको होऊस..,
आणि मला तर वजन ५० करायचय. (आत्ता ५१ आहे.)
.
म्हंटलं #instafamily #महाराष्ट्राला विचारूया, तुम्हाला काय वाटतं.
.
प्राजक्ता तुम्हांला कशी आवडते?
१- वजन ५१ ok आहे.
२- वजन ५० कर.
३- वजन ५३ with #chubbycheeks .
.
#सांगापटापट.,😍
#लालछडी @♥️

marathi taraka

Next Post

sai tamhankar Agni screening night photoshoot

Tue Dec 10 , 2024
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) ‘अग्नी’ (Agni) हा चित्रपट ६ डिसेंबरला अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.

You May Like

Breaking News