एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ऑल्मोस्ट कॉमेडी हा नवा मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . या शोमध्ये मराठी मनोरंजन सृष्टीतील काही उत्तमोत्तम लेखक पहिल्यांदाच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी , ऋषीकांत राऊत यांसारख्या लेखकांनी यापूर्वी अनेक स्टँडअप कॉमेडी शो केले आहेत. त्यांनी अनेक मनोरंजक कथा लिहिल्या आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता हे लेखकरंगमंचावर येऊन आपल्या विनोदी कथा सांगून प्रेक्षकांना हसवणार आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर करणार आहेत. तिच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात आणखी रंगत येणार आहे. हा धमाकेदार कॉमेडी शो एव्हरेस्ट हास्य मराठी टीव्हीवर नाही तर यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी स्वीकारत हे लेखक आता कॅमेऱ्यासमोर येणार असून त्यांच्या लेखनाप्रमाणेच रंगमंचावरील त्यांची उपस्थितीही प्रेक्षकांना हसवणार आहे.