अभिनेत्री तेजश्री प्रधान अचानक स्टार प्रवाहाची लोकप्रिय प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यामागं मालिकेतील सावणी म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा निंबळेकरशी कनेक्शन असल्याचं बोललं जातंय. तेजश्री प्रधान हिने अचानक प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानं सध्या मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. तेजस्वीच्या अचानक तिच्या एक्झिटमुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. पण याबाबत तेजश्रीनं अद्याप मौन धारण केल्याचं पाहायला मिळतंय.
आता अभिनेत्री स्वर्धा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे प्रेमाची गोष्ट मधील सावली म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा निंबळेकरनं स्पर्धासाठी खास पोस्ट केली होती शिवाय या निमित्ताने दोघी सेलिब्रेशन देखील करताना दिसल्या होत्या. पण दुसऱ्या बाजूला तेजस्वी आणि अपूर्वाच्या मैत्रीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तेजस्वीचं मालिका सोडण्यामागचं कनेक्शन अपूर्वाशी असल्याचं म्हटलं जातंय. तेजश्री मालिका सोडल्यानंतर दोघींनी सोशल मीडियावर एकमेकींना अनफॉलो केला आहे. तसंच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघी दुबई ट्रिपला गेल्या होत्या याचे फोटो सुद्धा डिलीट केले आहेत. त्यामुळे सध्या तेजस्वीनं अचानक मालिका सोडण्यामागचं कनेक्शन अपूर्वा आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय. त्याचबरोबर मालिका सोडल्यानंतर तेजस्वी प्रधान एक पोस्ट शेअर केली होती ज्यात लिहिलं होतं चियर्स काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही.